शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

थोडेसे काही


 

...अखेरीस २०२१ संपता-संपता मुहूर्त लागला ! गेली कित्येक वर्षे ब्लॉग लिहीन म्हणतोय , पण दर वेळेची न्यू इयर रिसोल्युशन तिथेच अडकते. पहिली काही वर्षे ब्लॉगचे टायटल ठरवण्यात गेली नंतरची नुसते ब्लॉग चे विषय वगैरे आणि जोडीला आळस होताच . शेवटी आळसावरच लिहायचे ठरवले पण  ते ही बरोब्बर नावारूपाला निघाले !

असो, मध्यंतरी माझ्या काही मित्रांच्या ब्लॉग्सचा नुसता सुळसुळाट चालू झाला. जो जे वांछील तो ते छापो असे काहीसे सुरु झाले. मग त्यावर खरमरीत प्रतिक्रिया देणे असल्या कारणास्तव वेळ घालवला. पण मूळ लेखापेक्षा माझ्या प्रतिक्रियांवर जेंव्हा हे ब्लॉग जास्त खपू (कि खुपू ?) लागले तेंव्हा या लेखाला पुढे पाठवण्याऐवजी या लेकाला पुढे चाल असे म्हणून मी प्रतिक्रिया बंद केल्या. पण सगळ्या समाज माध्यमांमधून माझ्या तमाम चतुर आणि चाणाक्ष चाहत्यांकडून मला आता प्रचंड आग्रह होत आहे, तस्मात मी सुद्धा !

खरे सांगायचे झाले तर इयत्ता दहावी (निबंधमाला) नंतर फारसे काही लिहिलेच नाही तेंव्हा माझे स्वतःचे प्रभुत्व असणाऱ्या मराठी, हिंदी कि इंग्रजी भाषेतून लिहायचे  हा प्रश्न आला. शिवाय गद्य कि पद्य ? तूर्तास सगळ्या भाषांतून थोडेसे पद्य लिहावे असे ठरविले आहे. हे थोडेसे काही ( काही लबाड मित्रांच्या भाषेत काहीच्या काही ) तुम्हां (पुन्हा) चतुर आणि चाणाक्ष वाचकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही. माझ्या या काव्य पुष्पांचा तुम्ही (पुन्हापुन्हा) चतुर आणि चाणाक्ष मंडळी पुष्पगुच्छ (पाकळ्या नव्हे) स्वीकार कराल ही अपेक्षा !

कळावे आणि लोभही असावा. 

- अजित 

६ टिप्पण्या:

  1. नवीन वर्षाच्या आणि ब्लॉगच्या शुभेच्छा! हा ब्लॉग आमच्या सारख्या मित्रांना उलट खरमरीत टिप्पणी करणेसाठी एक आशेचा किरण आहे! लिहिते व्हा. लिहिते रहा.

    उत्तर द्याहटवा
  2. ब्लॉगच्या या दुनियेस
    देण्यास संजीवनी
    सरसावला सज्ज झाला
    आळस सगळा झटकुनी

    सोपे नसे परंतु
    आव्हान समरांगणी
    टपले बहु आहेत
    होण्यास वक्री शनी

    असल्या भंगार कविता टाकण्यासाठी हे हक्काचे स्थान आहे असे आम्ही समजतो आणि पुढील तेजस्वी वाटचालीसाठी कोरड्या शुभेच्छा देतो. शुभम् भवतु

    उत्तर द्याहटवा

अर्धरथी - २

 फिर जब आंखे मिचमिचाई प्रखर तेज की ऊर्जा मैंने पाई लगा जैसे हरि ने दर्शन दिया पर हरिणी ने स्वरूप विस्तार किया होठों से पहुंची आंखों तक लाली ...